गाडी सुटली, रुमाल हलले
गाडी सुटली, रुमाल हलले, क्षणात डोळे टचकन ओले
गाडी सुटली, रुमाल हलले, क्षणात डोळे टचकन ओले
गाडी सुटली, पडले चेहरे, क्षण साधाया हसरे झाले
गाडी सुटली, हातामधुनी हात कापरा तरी सुटेना
गाडी सुटली, हातामधुनी हात कापरा तरी सुटेना
अंतरातली ओली माया तुटू दे म्हटले तरी तुटेना
का रे इतका लळा लावुनी नंतर मग ही गाडी सुटते?
का रे इतका लळा लावुनी नंतर मग ही गाडी सुटते?
डोळ्यांदेखत सरकत जाते, आठवणींचा ठिपका होते
गाडी गेली, फलाटावरी नि:श्वासांचा कचरा झाला
गाडी गेली, फलाटावरी नि:श्वासांचा कचरा झाला
गाडी गेली, डोळ्यांमधल्या निर्धाराचा पारा फुटला
गाडी गेली, डोळ्यांमधल्या निर्धाराचा पारा फुटला
हे भलते अवघड असते
हे भलते अवघड असते
कुणी प्रचंड आवडणारे, ते दूरदूर जाताना
डोळ्यांच्या देखत आणि नाहिसे लांब होताना
कुणी प्रचंड आवडणारे, ते दूरदूर जाताना
डोळ्यांच्या देखत आणि नाहिसे लांब होताना
डोळ्यांतील अडवून पाणी, हुंदका रोखुनी कंठी
डोळ्यांतील अडवून पाणी, हुंदका रोखुनी कंठी
तुम्ही केविलवाणे हसता
तुम्ही केविलवाणे हसता अन् तुम्हास नियती हसते
हे भलते अवघड असते
हे भलते अवघड असते
तरी असतो पकडायाचा हातात रुमाल गुलाबी
वार्यावर फडकवताना पाह्यची चालती गाडी
तरी असतो पकडायाचा हातात रुमाल गुलाबी
वार्यावर फडकवताना पाह्यची चालती गाडी
ती खिडकितून बघणारी अन् स्वतःमधे रमलेली
ती खिडकितून बघणारी अन् स्वतःमधे रमलेली
गजरा माळावा इतुके
गजरा माळावा इतुके ती सहज अलविदा म्हणते
हे भलते अवघड असते
हे भलते अवघड असते
तुम्ही म्हणता मनास आता हा तोडायाचा सेतू
इतक्यात म्हणे ती, "माझ्या कधी गावा येशील का तू?"
तुम्ही म्हणता मनास आता हा तोडायाचा सेतू
इतक्यात म्हणे ती, "माझ्या कधी गावा येशील का तू?"
ती सहजच म्हणुनी जाते, मग सहजच हळवी होते
ती सहजच म्हणुनी जाते, मग सहजच हळवी होते
गजर्यातील दोन कळ्या अन्
गजर्यातील दोन कळ्या अन् हलकेच ओंजळीत देते
हे भलते अवघड असते
हे भलते अवघड असते
कळते की गेली वेळ, ना आता सुटणे गाठ
आपुल्याच मनातील स्वप्ने घेऊन मिटावी मूठ
कळते की गेली वेळ, ना आता सुटणे गाठ
आपुल्याच मनातील स्वप्ने घेऊन मिटावी मूठ
ही मूठ उघडण्यापूर्वी चल निघुया पाऊल म्हणते
ही मूठ उघडण्यापूर्वी चल निघुया पाऊल म्हणते
पण पाऊल निघण्यापूर्वी
पण पाऊल निघण्यापूर्वी गाडीच अचानक निघते
हे भलते अवघड असते
हे भलते अवघड असते
परतीच्या वाटेवरती गुदमरून जड पायांनी
ओठांवर शीळ दिवाणी, बेफिकीर पण थरथरती
परतीच्या वाटेवरती गुदमरून जड पायांनी
ओठांवर शीळ दिवाणी, बेफिकीर पण थरथरती
पण क्षणक्षण वाढत असते अंतर हे तुमच्या मधले
पण क्षणक्षण वाढत असते अंतर हे तुमच्या मधले
मित्रांशी हसतानाही हे
मित्रांशी हसतानाही हे दुःख चरचरत असते
हे भलते अवघड असते
हे भलते अवघड असते
हे भलते अवघड
Tradução automática
Este recurso será adicionado em breve.
Em breve, o EMXStudio poderá gerar uma tradução automática desta letra usando uma API ou pacote de tradução.
A tradução aparecerá aqui de forma organizada, mantendo o mesmo estilo das letras revisadas.
Resultado automático
Esta letra foi encontrada automaticamente e pode precisar de revisão.
Quando ela for adicionada ao catálogo principal do EMXStudio, poderá receber tradução, correção, categoria, artista vinculado e informações completas.